• Thu. Jan 23rd, 2025

    मुख्यमंत्री   यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे नेते यांनी आता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा ‘लेटर बॉम्ब’ राऊत यांनी फोडल्यानंतर किरीट सोमय्या या टीकास्त्र सोडलं . एवढं ‘फ्रस्ट्रेशन’ तब्येतीला चांगलं नसतं, काळजी घ्या. तुमचे बंधू मंत्री आणि तुमचंही प्रमोशन होईल. तुम्ही देखील मुख्य संपादक व्हाल, असा सल्ला सोमय्यांनी दिला आहे.

    शिवसेना खासदार राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यात केला आहे. राऊत यांच्या पत्रानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी पत्रात अनेक दावे आणि आरोप केले आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी केंद्रातील सरकार आणि महाराष्ट्र भाजपवर आरोप केले आहेत. तसेच आम्ही घाबरणार नाही, असा ठणकावून सांगितलं. यानंतर भाजपने राऊत यांच्यावर ‘नेम’ साधला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत पत्र प्रकरण, कोविड काळात कंत्राट दिल्याचा आरोप, पुण्यातील घटनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.कोविड काळात घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना लक्ष्य केलं.

    वडिलांनी आदेश दिला की, संबंधित कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्याच कंपनीला काम दिलं. कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. पैशांसाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला, असं किरीट सोमय्या म्हणाले. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना चहल यांनी दिले, सुजित पाटकर राऊत यांचा भागीदार आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवारानं काळी कामे केली आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे अनेक खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. या पत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ईडी आणि भाजपलाही इशारा दिला आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयासमोरच जाहीर पत्रकार परिषद घेणार आहे, पुढे काय होतंय ते फक्त पाहा, असा इशारा राऊत यांनी दिला आहे

    Share With Your Friends If you Loved it!